Monday, August 17, 2009

आजा नच ले...

आजा नच ले पाहिला. त्यातला एक प्रसंग - जेव्हा माधुरी गावातल जुन रंगमंदिर(थिएटर) वाचवण्याच्या प्रयत्नामधे असते - नविन नाटकासाठी गावातील लोकांची निवड करण्याचे काम सुरु आहे. एक शेंबडी मुलगी तिथे आलीये आणि ती आपल्या नाचाचे कौशल्य दाखवून माधुरीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतीये. हा नाच बघताना मला तर हसू आवरत नव्हते. आठवला का हे कॅरॅक्टर.. ह्म्म्म तीच ती कोंकणा सेन हो.. अगदी चित्र-विचित्र हावभाव करत केलेला तिचा नाच पहा कधीतरी आवर्जून.. :)
नंतर मला इतर काही सिनेमांमधले असे मजेशीर नाच तसेच काही 'हीरों'ची नाचण्याची इष्टाइल आठवत राहिले. मला आठवलेले काही नाच इथे देत आहे...
- 'सपनेमे मिलती है' (सत्या) मधला मनोज वाजपेय़ीचा नाच
- 'यारो सुनलो जरा' (रंगीला) या गाण्यात आमीरबरोबर त्याच्या मागे फिरणारया 'पक्या'चा नाच.
- 'सपनेमे कुडी वो कौनथी' (संजय दत्त आणि मनिषा कोईराला.) सिनेमाच नाव नाही आठवत. पण संजय दत्तच्या मागेपुढे नाचणारया भाईलोकांचा मजेशीर नाच मात्र आठवतोय.
- 'यारा ओ यारा' या गाण्यातला सनीचा नाच बघा. सायकलच्या टायरमधे पंपाने हवा भरतोय असं वाटत. - अलीकडच्या Delhi 6 मधील 'गेंदाफूल' गाण पाहिलय का? या गाण्यामधे अभिषेक, वहिदा इ. सगळे मिळून नाचत असतात तो प्रसंग छान वाटतो. 'मस्सकली' गाण्यातला सोनमचा नाच पण मजेशीर आहे.
- 'लक्ष' मधे 'अगर मै कहू' या गाण्यात चित्र-विचित्र हावभाव करत ऋतिकने केलेला नाच. तसेच त्याचा 'मै ऐसा क्यू हू' गाण्यातला नाचही लक्षात रहाण्यासारखा :)
- धरमपाजींची नाचण्याची इष्टाइल तर प्रसिद्धच आहे. तसेच जितेंद्रचे उड्या मारत नाचणे. पूर्वीच्या सिनेमांमधेले नाच पहायला छान वाटतात. गाण्याच्या तालावर मान आणि पाय एका ठराविक लयीत हलवून नाचायचे. मजा वाटते हे नाच पहाताना. :)
- 'भोली सुरत दिलके खोटे' मधली भगवानदादा ष्टाईलवरतर आपण जाम फिदा आहोत..
- पूर्वी मराठी सिनेमांमधे एक ठरलेला नेम असायचा. हिंदी गाण्यांचे मराठीमधे भाषांतर करायचे आणि अशा ४-५ गाण्यांचे मिश्रण करुन मराठी गाणे तयार करायचे. हे म्हणजे 'लक्शा' चे सिनेमे. त्यातल एक गाण मला अजूनही आठवत.
मूळ गाण होत 'आप जैसा कोई मेरे जिंदगीमे आये तो बात बन जाये...हो S हो S बात बन जाये..' आणि त्याचा मराठी अनुवाद असा केला होता
'तुमच्यावानी कोनी माझ्या जिंदगीत येईल
तर लै झाक होइल... हो S हो S लै झाक होइल...'
आठवतय का काही... अशी गाणी किंवा असे नाच ? :):)

4 comments:

Satish Gawde said...

चांगलं निरिक्षण आहे तुमचं... पण मुख्य नायक किंवा नायिका सोडून बाजुच्यांकडे कशाला बघता बाबा तुम्ही (just kidding... :-) )

'तुमच्यावानी कोनी माझ्या जिंदगीत येईल
तर लै झाक होइल... हो S हो S लै झाक होइल...'


अशी गाणी विशेषत: महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपटांमध्ये असायची आणि अगदी डोक्यात जायची...

Aparna said...

बाजूच्यांचे नाच बघायला जास्त मजा येते :)

'तुमच्यावानी कोनी माझ्या जिंदगीत येईल
तर लै झाक होइल... हो S हो S लै झाक होइल...'
खरयं अशी मराठी गाणी महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपटांमध्येच असायची

Ajay Sonawane said...

mala govinda chya dance madhle bajuche lok pahayala aavdayache, kai ek ek namune asayache te, ani baryach cinema madhye tech tech lok asayache.
BTW, ashok saraf cha "ashwini ye naa" yachyawarch dance bhalatach bhari, mi jam fida aahe tyachyvar,
anyway, observation bhari aahe tuja

Aparna said...

:):)