Thursday, August 13, 2009

सांज ये गोकुळी सावळी सावळी...

सांजवेळ... दिवस कलता झालेला अन निशेच्या आगमनाची चाहूल लागलेली...
मनाला एक अनामिक हुरहुर लावून जाते ही वेळ...
मनात जपलेल्या असंख्य गोष्टींचा गहिवर दाटून येतो. भावना व्यक्त करण ही प्रत्येकाची मानसिक गरज आहे. पण सगळ्याच वैयक्तिक गोष्टी या व्यक्त करण्यासाठी नसतात ना! काहीतरी खास असत जे फक्त आपल्याच मनाच्या एका कोपरयामधे जपून ठेवलेल असत. ही सांजवेळ मात्र या सगळ्या गोष्टींना मनाच्या पृष्ठभागावर घेऊन येते. एक स्वगत सुरु होत.. मनाच.. मनाशीच! पण या स्वगतामधलं एकटेपण नकोस होऊन जात कधी कधी.... मग मात्र मन कोणाच्यातरी वाटेकडे डोळे लावून बसतं. कोणीतरी आपल...मायेन जवळ घेणारं...कौतुकान पाठ थोपटणार...आपल म्हणण ऐकून घेणार...चूक असेल तर कान पकडून खडसावणार...
आपण अगदीच एकटेही नाही जगू शकत याची बोचरी जाणीव करुन जाते ही कातरवेळ...
तर कधी मोठ्या गोतावळ्यात वेढलेले असलो तरी आत कुठेतरी आपण एकटे आहोत हे वास्तवही समोर ठेवून जाते ही कातरवेळ..
मनाला एक अपूर्णतेची चुटपूट लावून जाते ही सांजवेळ...

13 comments:

bhaanasa said...

अवतिभोवती माणसे असली तरीही अशी गहिवरलेली सांजवेळ बैचेन करते तर एकटेपण असलेल्यांची अवस्था आणिकच बिकट. मनात सगळे एकटेच असले तरीही....कातरवेळ अन ढवळला गेलेला मनाचा डोह....
पोस्ट नेमकी.आवडली.

Aparna said...

'कातरवेळ अन ढवळला गेलेला मनाचा डोह'
अगदी एकाच वाक्यात मला काय म्हणायचय ते सांगून गेलीस. धन्यवाद.

mugdha said...

bhaanasa la anumodan..post nemaki aahe..khup aavadali

Aparna said...

धन्यवाद मुग्धा.

Ajay Sonawane said...

मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दात बरंच काही तु सांगितलं आहेस इथे.

Aparna said...

धन्यवाद अजय.

Junius said...

well...maahit naahi..there are some people who are just not the expression type...and they are normal too :)
some needs will not bother you if you dont acknowledge them

Aparna said...

yes there are people who are not expressive. It depends person to person whether to express or not... or how to express..
One can't pretend that there is no realization or acknowledgement of needs...

सतीश गावडे said...

अगदी मोजक्याच शब्दांत पण खुप छान लिहिलंय...

Aparna said...

धन्यवाद सतीश.

Nikhil Purwant said...

आपण अगदीच एकटेही नाही जगू शकत याची बोचरी जाणीव करुन जाते ही कातरवेळ
हे भारी लिहिलेयस ... असल्या नेमक्या वाक्यांतून बरेचसे सांगितले तर आहेसच वर त्यातून तुझे लिहायचे talent हि कळून येतेय ..
छान आहे. लिहित रहा.

Anil P said...

Very beautifully expressed. In the twilight moment the mind does meander in search of possibilities the evening promises.

Maithili said...

Agdi sunder...!!! Apratim..
Pratyek vaaky vaachtaana vatat hote ki arrechya he asech aapalyalahi vatate..!!! Khoop ch mast...